Skip to main content

Outline

आशयाचा परिचय

Gemini चे अवलोकन

Gemini हा Google चा सर्वात अष्टपैलू AI असिस्टंट आहे. ही एक मल्टीमोडल स्पेस आहे, जिथे तुम्ही मजकूर, इमेज, व्हिडिओ किंवा आवाज वापरून संवाद साधू शकता.

Gemini ला तुमचा असिस्टंट समजा; तुमच्या क्लाससाठी नियोजन आणि तयारी करण्याचे कठीण काम ते किती झटपट हाती घेतो, हिच त्याची खरी ताकद आहे:

  • स्कॅफोल्डिंगमध्ये मदत करणे: ते काही सेकंदांमध्ये मोठ्या प्रकरणाचे साध्या, स्‍टेप-बाय-स्‍टेप मार्गदर्शकांमध्ये विभाजन करू शकते.

  • सर्व शिक्षण पातळ्यांसाठी उपयुक्त: तुम्ही मोठा, कठीण परिच्छेद घेऊ शकता आणि Gemini ला भाषा अधिक सोपी करण्यास सांगू शकता.

  • झटपट मजेदार उदाहरणे तयार करणे: कठीण विषय तुमच्या विद्यार्थ्यांना आधीपासून आवडत असलेल्या गोष्टींशी जोडण्यासाठी ते दैनंदिन जीवनातील उदाहरणे किंवा तर्कसंगती झटपट तयार करू शकते.

सूचना आणि व्यावसायिक काम वर्धित करण्यासाठी Gemini हे सह-डिझायनर म्हणून काम करते. चला, त्याच्या काही वैशिष्ट्यांवर नजर टाकू या.

Gemini चा कमाल वापर करणे

Gemini हे नैसर्गिक भाषा समजून घेण्यासाठी डिझाइन केलेले असले, तरीही तुमच्या सुरुवातीच्या प्रॉम्प्टसाठी असलेल्या एका वाक्याच्या साध्या विनंत्यांच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सर्वात प्रभावी परिणाम मिळतील. चांगल्या नेमक्या केलेल्या सूचना तयार करण्यात तुम्हाला मदत करण्यासाठी, आम्ही प्रॉम्प्ट तयार करण्याकरिता सुरुवातीपासूनच PARTS फ्रेमवर्क वापरतो:

र्सोना: तुम्ही कोण आहात किंवा AI ने कोणती भूमिका घ्यावी हे ओळखा.

द्दिष्ट: तुमचे उद्दिष्ट स्पष्टपणे नमूद करा—तुम्हाला नेमके काय साध्य करायचे आहे?

मिळवणारे: तुमचे प्रेक्षक निर्दिष्ट करा, जसे की महाविद्यालयातील पहिल्या वर्षाचे किंवा प्राथमिक वर्गाचे विद्यार्थी.

थी: "विश्लेषणात्मक आणि औपचारिक" किंवा "विनोदी आणि आकर्षक" यांसारख्या हव्या असलेल्या शैली किंवा टोन याचे वर्णन करा.

चना: तुम्हाला अपेक्षित असलेले फॉरमॅट लक्षात घ्या, जसे की बुलेट पॉइंट सूची, रुब्रिक किंवा ३० सेकंदांची स्क्रिप्ट.

सुरक्षित आणि जबाबदार वापर

ही क्षमता बदल घडवून आणणारी असली, तरीही त्यांना तुमच्या व्यावसायिक देखरेखीची आवश्यकता आहे. कारण AI "सर्वाधिक शक्यता" या पुढील पायरीचा पूर्वानुमान लावत असल्यामुळे, त्यात मानवी पूर्वग्रह किंवा "हल्युसिनेट" केलेली तथ्येदेखील असू शकतात. Google च्या AI तत्त्वांना मानवी देखरेखीखाली या दृष्टिकोनाची आवश्यकता आहे: AI कडून पहिला ड्राफ्ट दिला जातो, पण अंतिम निर्णय घेण्यासाठी तुम्ही तुमची कौशल्ये वापरू शकता.

उपयुक्त AI टूल आणि तंत्रज्ञाने तयार करून ज्ञान समृद्ध करण्यासाठी, गुंतागुंतीच्या आव्हानांचे निराकरण करण्यासाठी व लोकांना प्रगती करण्यात मदत करण्यासाठी Google कसे वचनबद्ध आहे याविषयी अतिरिक्त माहिती मिळवण्याकरिता तुम्ही ai.google ला भेट देऊ शकता.

डेमो

चला एक सामान्य विषय घेऊ: हरितगृह परिणाम आणि Gemini हे बालवाडी ते बारावी तसेच उच्च शिक्षण यांसाठी धड्याची रचना कशी हाताळते ते पाहू.

डेमो- बालवाडी ते बारावी

डेमो- उच्च शिक्षण

सराव करा

आता तुमची पाळी आहे. Gemini ला तुमच्या अभ्यासक्रमातील त्या एका कठीण विषयावर काम करू द्या - ती एक अवघड संकल्पना जिथे तुमचे विद्यार्थी नेहमी अडकतात किंवा स्वारस्य गमावतात.

तुमची टास्क:

१. ॲक्सेस करा: gemini.google.com उघडा.

२. रीफ्रेम केलेला प्रॉम्प्ट: Gemini ला ती कठीण संकल्पना घेऊन "तीन वेगवेगळ्या प्रकारे ती स्पष्ट कर: गोष्ट रूपात, स्टेप-बाय-स्टेप केलेली प्रक्रिया रूपात आणि व्हिजुअल सादरीकरण रूपात." असे सांगा

३. स्कॅफोल्ड केलेला प्रॉम्प्ट: Gemini ला “या विषयावर निबंध लिहिण्यास विद्यार्थ्याला मदत करण्यासाठी सुरुवातीची वाक्ये सुरू करण्यासाठी लिहून दे.” किंवा “या विषयावर १००० शब्दांचा निबंध लिहिण्यासाठी संरचित रुब्रिक जनरेट कर.” असे सांगा.

४. सुधारित करा: Gemini ला ‘प्रतिसाद द्या’. पुढील गोष्टी वापरून पहा: "हे थोडे जास्त औपचारिक आहे. माझ्या विद्यार्थ्यांसाठी अधिक संभाषणात्मक आणि गुंतवून ठेवणारा प्रतिसाद बनवा."

विचार करा

या सेशनमध्ये, आम्ही पाहिले आहे, की Gemini हे फक्त चॅटबॉट नाही; ते उच्च गुणवत्तेच्या सूचनांसाठीचे इंजीन आहे.

तुमच्या सरावावर विचार करू या:

तुमच्या वर्गातील अनुभवावर विचार केल्यास, Gemini वापरल्याने तुमच्या विद्यार्थ्यांना गुंतागुंतीच्या संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यात आणि अमूर्त पाठ्यपुस्तकातील सिद्धांत व त्यांचे दैनंदिन जीवन यांमधील अंतर भरून काढण्यात कशी मदत होऊ शकते?